Home Political यवतमाळ नगरपरिषदेतील नगरसेवक कक्षाची दयनीय अवस्था

यवतमाळ नगरपरिषदेतील नगरसेवक कक्षाची दयनीय अवस्था

0
63

नगरसेवकांनी स्वतः हाती घेतली स्वच्छता मोहीम
यवतमाळ नगरपरिषद च्या प्रशासकीय इमारतीमध्ये नगरसेवकांना बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सभागृहाची आज नगरसेवकांनी पाहणी केली असता अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. संबंधित सभागृहात मोठ्या प्रमाणात घाण साचलेली होती, अनेक दिवसांपासून झाडू न मारल्याचे स्पष्ट दिसून येत होते. तसेच सभागृहामध्ये खालच्या भागातून कुठेतरी पाणी वाहत असल्याने परिसर अस्वच्छ व गैरसोयीचा बनला होता.
या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ उपस्थित गटनेते तथा नगरसेवक डॉक्टर नीरज वाघमारे व नगरसेवक बिपिन चौधरी या नगरसेवकांनी स्वतः झाडू हाती घेऊन सभागृहाची साफसफाई केली. तसेच वाहणाऱ्या पाण्यामध्ये कागदाचे प्रतीकात्मक जहाज सोडून नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेचा निषेध नोंदविला.
नगरपरिषदेच्या इमारतीतील नगरसेवकांसाठी राखीव असलेल्या सभागृहाचीच अशी दयनीय अवस्था असेल, तर यवतमाळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या स्वच्छता व नागरी सुविधांची स्थिती काय असेल, याचा विचार प्रशासनाने व नागरिकांनी करणे आवश्यक आहे.
यवतमाळ शहरात स्वच्छता, देखभाल व मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असून याबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपॆक्षा यावेळी नगरसेवकांनी केली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here