यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तर्फे साहेबराव कांबळे महायुतीतर्फे दुष्यंत चतुर्वेदी व वरिष्ठांचा आदेशाचे पालन करून भाजपचे नितीन भुतडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता .450 पेक्षा कमी मतदान असलेल्या व पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य नसलेल्या ह्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व मित्र पक्षाचे मतदानांचे संख्याबळ जास्त आहे .त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होण्याच्या अगोदरच सरकारने नगरपालिका व नगरपंचायतच्या भरवशावर निवडणुका जाहीर झाल्या .महाविकास आघाडी तर्फे ही जागा जरी काँग्रेसला सुटली असली तरी या निवडणुकीत खर्च करणारा व सर्वांच्या परिचयाचा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस काँग्रेसची इज्जत पणाला लागली असताना महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी तिकीट मिळवण्यात यश मिळवले आणि प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात ही केली . यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट नंबर एक भाजप दोन आणि काँग्रेस 3 क्रमांकावर मतदानात होती .*कितीही प्रयत्न केला तरी मतदानाची जुळवाजुळ होत नसल्यामुळे साहेबराव कांबळे यांनी ह्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेऊन आज दिनांक 3 मे 2026 रोजी रितसर अर्ज देऊन माघार घेतलेली आहे .साहेबराव कांबळे यांनी जबरदस्त प्रचार यंत्रणा राबविली असली तरी मतांची जुळवाजुवळ होत नसल्यामुळे त्यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे यातून त्यांची चाणक्य राजनीति दिसून येते.
साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेऊन पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांची संतप्त प्रतिक्रिया.
राहीला प्रश्न आता भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी भरलेल्या अर्जाचा ! काल त्यांना वरिष्ठ नेत्यांनी मुंबईला बोलावले असून आज त्यांच्या पक्षाची महत्त्वाची बैठक आहे आणि यामधून अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी शमविण्याचा प्रयत्न होऊ शकतो .नितीन भुतडा यांनी प्रथमच सांगून टाकले आहे की मी वरिष्ठांच्या आदेशाने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि वरिष्ठांनी आदेश दिल्यास मी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहे .आजची राजकीय घडामोड पाहता नितीन भुतडा सुद्धा उमेदवारी वापस घेऊ शकतात अशी चर्चा आहे .व नितीन भुतडा यांनी उमेदवार वापस नाही घेतल्यास शिंदे गटाचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी व भारतीय जनता पक्ष्याचे उमेदवार नितीन भुतडा यांच्यामध्ये मात्र काट्याची लढत होण्याची दाट शक्यता आहे .पण नितीन भुतडा युतीधर्म पाळतात की मैत्रीपूर्ण लढत देतात हे पाहणं औचित्यच ठरणार आहे.✍️✍️




