राज्य शासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्रकल्पबाधीत प्रकल्पग्रस्तांसाठी ५०% प्रमाणात गट क व गट ड सवर्गाची पद भरती राबविण्यास एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली असुन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत गट क आणि गट ड सावर्गाच्या जाहिराती दि. २५ आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आणि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व सवर्गाच्या लेखी परीक्षा दि २६ ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घेण्यात आल्या आणि निकाल प्रसिद्ध करण्यात आला तसेच पात्र असलेल्या सर्व उमेदवारांची कागतपत्र पडताळणी विद्यापीठ प्रशासन तसेच पुनर्वसन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे कडून पुर्ण करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया पुर्ण झाली असल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त उमेदवार नियुक्ती केव्हा मिळते? या प्रतीक्षेत होते . कारण या भरती प्रक्रियेला जवळपास एकवर्षाहून जास्त काळ लोटला असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये अस्वस्थता वाढली होती. अनुषंगाने सर्व प्रकल्पग्रस्तानी पूर्व चे आमदार तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आ. रणधीरजी सावरकर यांना भेटून याबाबत साकडे घातले. नेहमी प्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आ. सावरकर स्वतः पुढाकार घेत प्रकल्पग्रस्त विशेष पद भरतीचा विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठामध्ये बैठक लाऊन मंगळवार दि २६ मे २०२६ रोजी आढावा घेतला. या संदर्भात त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख आणि कुलसचिव श्रीमती प्रीती रोडगे यांच्या सोबत चर्चा केली तसेच पुनर्वसन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना केल्या आणि सर्व प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळावा हाच राज्य शासनाचा अजेंडा असुन त्यानुसार सर्व प्रकिया जून महिन्यात पुर्ण करावी अशा सूचना त्यांनी विद्यापीठ प्रशासनास यावेळी केली आहे. तसेच त्यांनी सर्व प्रकलग्रस्त उमेदवारांना आश्वासित केले की सदर भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असुन लवकर च पात्र उमेदवारानां नियुक्ती आदेश मिळतील. व मी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीर पणाने उभा असल्याचे सांगितले. आ.सावरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि दिलेल्या आश्वासनमुळे सर्व प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.




