वर्धा:- महिला व अल्पवयीन मुलीवर वाढत्या घटना रोखण्यासाठी आणि सामाजिक जनजागृतीत कार्यरत असलेल्या दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस मिञ जिल्हा संघटक पदी श्री प्रशांत कोसुरकर यांची निवड फाऊंडेशन चे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश खंडार यांनी केली.या प्रसंगी समाजातील विघातक प्रव्रुत्तीला आळा घालणे.पोलीस प्रशासनाला मदत करणे. जनजागृती करणे.तसेच लोक सुरक्षा अभियान राबवणे. या उद्देशाने जनहितार्थ हिंगणघाट व शहरा समीपच्या जाम. गिरड. समद्र पूर.अल्लीपूर.वडनेर.सिंदी.( रेल्वे) दहेगाव .सेलू पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
समाजात चांगल्या सोबत वाईट गोष्टी बढतीवर आहे.वाईप प्रव्रुत्तीला अंकुश लावणे नागरीकांना सुखाने जगता यावे. आणि वाढत्या गुन्हेगारीच्या काळात सामाजिक मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत असू असा विश्वास दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस मिञ वर्धा जिल्हा संघटक श्री प्रशांत कोसुरकर यांनी व्यक्त केला.असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.